महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Maharashtra Weather Update: पुढील आठवडाभर राज्यातील विविध ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जन व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.... - महाराष्ट्र हवामान अंदाज पुढील आठवडा

🎬 Watch Now: Feature Video

महाराष्ट्र हवामान अंदाज

By

Published : May 30, 2023, 8:54 AM IST

पुणे :गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे.  उन्हाळ्यात देखील पावसाळ्याचा अनुभव राज्यातील अनेक ठिकाणी पाहायला मिळाला आहे. असे असले तरी राज्यातील काही ठिकाणी उन्हाचा चटकादेखील जाणवत आहे. पुढील आठवडाभर राज्यातील विविध ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जन व विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या तज्ज्ञ शिल्पा आपटे यांनी व्यक्त केली आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 29 मे ते 2 जून पर्यंत राज्यातील कोकण - गोवा या ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मध्ये 29 मे ते 30 मे पर्यंत या ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर 31 मे आणि 2 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  तर 31 मे आणि 2 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा या ठिकाणी देखील 29 मे ते 30 मेपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 31 मे आणि 2 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तर 29 मे ते 31 मेपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट व सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर 1 आणि 2 जूनपर्यंत या ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
 

ABOUT THE AUTHOR

...view details