Deepak Kesarkar On Ajit Pawar : अजित पवार युतीत आले तर.... ; दीपक केसरकर यांनी स्पष्टच सांगितले - अजित पवारांचे युतीत स्वागत
पुणे:अजित पवारांसारखा नेता भाजप-शिवसेना युतीत आला तर आम्ही त्यांचे स्वागत करू, अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट मी करून दिली होती. उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळायला हवा होता. भाजपने आपला शब्द पाळला होता, मग उद्धव ठाकरेंनी तो शब्द महाराष्ट्रात येऊन का फिरवला? असा प्र्श्नही केसरकरांनी केला.
कुरमुडे ज्योतिषी वाढले: नरेंद्र मोदींनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाचे माहीत नाही; पण एका विश्वासाने मुख्यमंत्रीपदीला गेल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. सरकार पंधरा दिवसात पडेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. त्यावर बोलताना देताना दीपक केसरकर म्हणाले, कुरमुडे ज्योतिषी वाढले आहेत. त्यामुळे ते असे बोलत असतात. शरद पवार यांनी त्यांना समजून सांगायला हवे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अभ्यासू व्यक्तिमत्व महाराष्ट्राला मिळाले असल्याचेसुद्धा शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले.