भारत-ऑस्ट्रेलिया सामना; शिवसेनेतर्फे बिग स्क्रीनचं आयोजन - बिग स्क्रीनचे आयोजन
Published : Nov 19, 2023, 4:34 PM IST
मुंबई World Cup 2023 जगभरातील क्रीडा प्रेमींचे आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या अंतिम सामन्याकडं लागलं आहे. आज क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळत आहे, अर्थात मागील दीड महिन्यापासून भारतात सुरू असलेला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आज अंतिम सामना आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना गुजरातमधील अहमदाबाद येथे होत आहे. त्यामुळं या सामन्याची उत्सुकता सर्व भारतीयांना दिसत आहे. दरम्यान अंतिम सामना जिंकून भारतानं वर्ल्डकप जिंकावा असं प्रत्येक भारतीयाला वाटत आहे, यासाठी दोन दिवसापासून देशातील विविध भागात प्रार्थना केली जाते. प्रार्थना, यज्ञ, होमोहन केले जात आहे. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना मुंबईकरांना मोठ्या स्क्रीनवर पाहता यावेसाठी शिवाजी पार्क येथील मैदानावर शिवसेनेतर्फे बिग स्क्रीनच्या आयोजन करण्यात आले आहे. बिग स्क्रीन मधून मुंबईकरांना अंतिम सामन्यांचा आनंद लुटता यावा, यासाठी या स्क्रीनच्या आयोजित करण्यात आले असल्याचे शिवसेना नेते समाधान सरवणकर यांनी म्हटले आहे.