Chhagan Bhujbal : मी कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही - छगन भुजबळ - छगन भुजबळ
नाशिक (येवला) : जो तरुण छगन भुजबळांच्या कानाखाली मारेल, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असे वक्तव्य परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केले होते. याबाबत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. मी कोणत्याही देव, दैवतांचा अपमान केलेला नाही आणि मी कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही. मी 55 वर्षांपासून समाज व राजकारणात असून अशा अनेक धोक्यातून मी गेलेलो आहे, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. आपल्याला शिक्षण दिले ते महात्मा फुले (Mahatma Fule), सावित्रीबाई फुले, शाहू महाराज (Shahu Maharaj) आणि कायद्यात ज्याचे पूर्ण रूपांतर केले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) आणि त्यानंतर भाऊराव पाटील तसेच नंतर रावसाहेब थोरात यांनीच. पण कोणाला सरस्वती आवडते, पण आम्ही यांना कधी पाहीले नाही. आम्हाला काही त्यांनी शिक्षण दिले नाही. आम्हाला ज्यांनी शिक्षण दिले ते या लोकांनी दिले, म्हणून ते माझे देव आहेत. तेच देव तुमचेही असले पाहिजेत, असे मंत्री भुजबळ यावेळी म्हणाले.