Holi 2023 : घरच्या घरी राजस्थानच्या प्रसिद्ध बिकानेरी भुजियाचा आनंद घ्या... - स्वादिष्ट पदार्थ
नवी दिल्ली : होळी म्हटले की रंग आणि विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद देणारा सण होय. होळीच्या आणि रंगपंचमीच्या दिवशी प्रत्येक राज्यात त्या-त्या चालीरीतींप्रमाणे विविध खाद्यपदार्थ बनत असते. यामध्ये गोड, तिखट, मसालेदार अश्या स्वादिष्ट पदार्थांचा समावेश असतो. आज आपण लहान मुलांपासुन ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ कसा बनवायचा ते बघणार आहोत. होळीच्या निमित्ताने काही फराळाचे पदार्थ बनवायचे असतील तर, भुजिया हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बिकानेरी भुजिया हे राजस्थानचे प्रसिद्ध नमकीन आहे. भुजिया बनवायला सोपा, सरळ आणि बराच काळ खाण्यायोग्य राहतो. कमी मसाले असलेली ही मसालेदार रेसिपी तुम्हाला खूप आवडेल. चला जाणून घेऊया घरगुती नाश्ता म्हणजेच कुरकुरीत-चटपटी बिकानेरी भुजिया कसा बनवायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून.