हिंगोली जिल्हा परिषद इमारतीला आग; जिवाची पर्वा न करता आगीतून वाचवला तिरंगा ध्वज, पाहा व्हिडिओ - Tricolor Flag Saved
Published : Nov 22, 2023, 8:05 PM IST
हिंगोली Hingoli Zilla Parishad : हिंगोली जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक आग (Hingoli zilla Parishad Building Fire) लागली. एकीकडे आगीने उग्र रूप धारण केलं असताना, दुसरीकडं कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता तिरंगा ध्वज (Tricolor Flag) आगीतून वाचवला आहे. हिंगोली जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली होती. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्यावरील बाजूस तिरंगा ध्वज जळणार हे लक्षात येताच, जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसलेले तीन कंत्राटी कर्मचारी दीपक लोखंडे, वसंत पवार, मोसिन परंबर या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सोडून जिवाची पर्वा न करता आग लागलेल्या इमारतीच्या छतावर चढून तिरंगा ध्वज सुखरुप बाहेर काढला. यामुळं त्यांचं कौतुक केलं जात आहे. तर आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलीस करत आहेत.