Himanshu Mhatre drowned : शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाच्या 22 वर्षीय नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू - शिवसेना माजी जिल्हाप्रमुखाच्या नातवाचा मृत्यू
ठाणे :शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाच्या 22 वर्षीय नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तुर्भे येथे घडली. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हिमांशू म्हात्रे हा बोनकोडे गावातील रहिवाशी होता. हिमांशू पोहण्यासाठी तुर्भे इंदिरानगर गणपती पाडा येथील खोल तळ्यात उतरला होता. तळ्यातील पाण्याचा अंदाज हिमांशूला आला नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मुत्यू झाला. हिमांशू शिवसेनेचे माजी नेते व माजी नवी मुंबई जिल्हाप्रमुख हरिभाऊ म्हात्रे यांचा नातू होता. रविवारी रात्र होऊनही हिमांशू घरी आला नसल्याने त्याचा शोध सुरू झाला. काही वेळानंतर हिमांशू हा तुर्भे गणपती पाड्याजवळ पोहण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तळ्यात त्याचा शोध सुरू झाला. नवी मुंबई अग्निशमन दलाचे जवान काल रात्री उशिरापर्यंत तळ्यातील पाण्यात त्याचा शोध घेत होते. परंतु त्याचा शोध लागला नव्हता. अखेर आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास घटनास्थळी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांमार्फत शोधकार्य करण्यात आले. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर खदानीच्या पाण्यात बुडालेला हिमांशूचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.