Guru Purnima in Shirdi: गुरुपौर्णिमेच्या शुभमुहर्तावर अमेरिकेतील टेक्सास येथील साईभक्ताने केला साईचरणी 20 लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण - सोन्याचा मुकुट
अहमदनगर : गुरुपौर्णिमेच्या शुभमुहर्तावर अमेरिकेतील टेक्सास येथील सॉफ़्टवेयर इंजीनियर वामसी कृष्णा यांनी साई बाबांना वीस लाख रुपयांचा सोन्याचा मूकूट अर्पण केला आहे. अत्यंत सुंदर कारागिरी केलेला आणि मौल्यवान खड्यांनी सजवलेला हा मुकूट आज बाबांना अर्पण करण्यात आला आहे. दानशूर साईभक्त वामसी कृष्णा हे मूळ हैद्राबाद येथिल निवासी आहेत. ते सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. आपल्याला कामात मिळत असलेले यश हे साईबाबांच्या कृपा आशीर्वाद मिळत असल्याने खास अमेरिकेतून साईबाबांना गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने मुकूट चढवण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगीतले आहे.
गुरुपोर्णिमा निमित्ताने दरवर्षी भाविक साईंना गुरुदक्षिणा अर्पण करत असतात, अशाच या भाविकान अत्यंत सुंदर कारागीरी केलेला आणि सोन्याचा मुकूट साईंना अर्पण केला आहे. सोन्याच्या या मुकूटाचे वजन 365 ग्रॅम आहे. आज गुरुपौर्णिमेला मध्यान्ह आरतीला चढवण्यात येणार आहे. साई संस्थानच्या वतीन दानशूर साईभक्तांचा यावेळी साईची मुर्ती आणि शॉल देवून यथोचित सत्कार करण्यात आला आहे.