Ganeshotsav २०२३ : पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष; पाहा, दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती - गणेश चतुर्थी
Published : Sep 19, 2023, 9:12 AM IST
पुणे :चौदाविद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या गणरायाचं आज आगमन होत आहे. आज पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचंही बाप्पांच्या जयघोषात आणि ढोल - ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत होईल. दहा दिवसांच्या या मंगलमयी उत्सवासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टनं यंदा अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाईल. तत्पूर्वी आज सकाळी ७ वाजता मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. यानंतर मंदिरातून गणेशाची मूर्ती बाहेर काढून रथावरून तिची मिरवणूक काढण्यात येणार आहे. पहा दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीचा हा व्हिडिओ..