Ganesh Visarjan 2023: पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतला गणेश विसर्जन मिरवणूकीचा आनंद, पाहा व्हिडिओ - Sandeep Karnik enjoyed Ganesh Visarjan
Published : Sep 28, 2023, 4:33 PM IST
पुणेPune Ganesh Visarjan: आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झाल्यावर मोठ्या उत्साहात नागरिकांनी आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा केलीय. आत्ता आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आलीय. पुण्यातील मानाच्या तसंच विविध गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणूकीची तयारी पूर्ण झालीय. आज सकाळी साडे दहा वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून विसर्जन मिरवणूकीची सुरुवात झाली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात विसर्जन (Ganesh Visarjan 2023) मिरवणूकी पार पडत आहे. मोठ्या संख्येनं नागरिक विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाले आहेत. पुण्याच्या या गणेश विसर्जन मिरवणूकीत मोठा उत्साह पाहायला मिळतोय. अश्यातच पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस बंदोबस्ताच तणाव असतानादेखील विसर्जन मिरवणूकीचा आनंद घेतलाय. (Sandeep Karnik enjoyed Ganesh Visarjan)