Ganesh Visarjan 2023: चिंचपोकळी चिंतामणी राजाच्या मिरवणुकीत भक्तांची प्रचंड गर्दी, पहा व्हिडिओ
Published : Sep 28, 2023, 5:21 PM IST
मुंबईGanesh Visarjan 2023: 'गणराज रंगी नाचतो' अशा प्रकारच्या अनुभूतीत गणेश भक्तांना दहा दिवस कसे गेले, ते समजलंच नाही. आज आपल्या आवडत्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस येऊन ठेपलाय. जड अंतकरणाने बाप्पाला आज मुंबईसह राज्यभर निरोप दिला जातोय. मुंबईतील चिंचपोकळीतील चिंतामण राजाच्या विसर्जन मिरवणुकीत भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळालीय. मोठ्या पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक आहे. मनोभावी पूजा करत नऊ दिवसांपूर्वी गणपती बाप्पा विराजमान झाले होते. मुंबईतील गिरगाव परिसरातील गणेश मूर्तीच्या उंचीमुळे प्रसिद्ध आहे. चिंचपोकळी येथील चिंतामणी राजाच्या भव्य दिव्य अशा गणेश मूर्तीच्या उंची खास आकर्षण आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणी राजाच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरवात झाली होती. यावेळी राजाच्या विसर्जन मिरवणूकीत देखील देशातील अनेक राज्यातून आलेले गणेशभक्त झाली असल्याची माहिती माजी अध्यक्ष विद्याधर गाढी यांनी दिलीय. (Ganesh Visarjan in Mumbai Chinchpokli Chintamani)