Ganesh Visarjan 2023: मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांची गर्दी - गणेश विसर्जन 2023
Published : Sep 28, 2023, 4:37 PM IST
पुणे Ganesh Visarjan 2023:आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यावर मोठ्या उत्साहात नागरिकांनी गणरायांची सेवा केली. आता त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे. पुण्यातील मानाच्या तसेच विविध गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. आज अनंत चतुर्दशीला (Ganesha Immersion Preparation ) सकाळी साडे दहा वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. श्रीगणेशांचा जयजयकार करत पुण्याच्या मानाच्या चौथ्या श्री (Anant Chaturdashi 2023 ) तुळशीबाग गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला आरंभ झाला आहे. (Ganesha Immersion in Pune)
अतिशय भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली. (Ganesh Immersion ) मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत महाकाल रथातून बाप्पाची प्रतिमा विराजमान केली गेली. २८ फूट उंचीच्या रथामध्ये फुलांनी सजवलेली १२ फूट उंचीची महाकाल पिंड आहे. लाकडी पुलाजवळील मेट्रो पुलामुळे उंचीला मर्यादा असल्याने यंदा पहिल्यांदाच रथामध्ये हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. उज्जैन येथील श्री महाकालेश्वराच्या सवारीची आठवण या मिरवणुकीने होईल. उज्जैनचे अघोरी महाराजांचा यात सहभाग आहे. लोणकर बंधूंचा नगारा वादनाचा गाडा, स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी, शिवप्रताप ही ढोल-ताशा पथके सहभागी झाली आहेत.