Ganesh Festival 2023: लालबागमधील पर्यावरणाचा राजा पाहण्यासाठी भाविकांच्या लागल्या रांगा, पाहा व्हिडिओ - Tejukaya sarvajanik Ganeshotsav Trust
Published : Sep 20, 2023, 9:26 PM IST
मुंबईGanesh Festival 2023: तेजूकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट हे लालबागमधील प्रसिद्ध असं गणपती मंडळ आहे. तेजूकायाचा गणपतीला पर्यावरणाचा राजा म्हणून ओळखला जातोय. त्याची मोठी ख्याती आहे. जवळपास 700 किलो कागदाच्या लगद्यापासून बनवलेली भव्य वीस फुटी गणरायाची राम रूपातील मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड रांगा लागल्या आहेत. लालबागमधील प्रसिद्ध अशा मंडळांपैकी तेजूकाया गणेशोत्सव मंडळ हेदेखील आहे. (Tejukaya sarvajanik Ganeshotsav Trust) हातात धनुष्यबाण परिधान केलेला राम अवतारातीला बाप्पा पाहण्यासासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त येत आहेत. तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे खजिनदार कौशल रामपुरे यांनी याविषयी माहिती दिलीय. सध्या सगळीकडे बाप्पाच्या आगमणामुळं आनंदाचं वातावरण आहे. मुंबईमध्ये उत्सवाचा मोठा जल्लोष पाहावयास मिळतोय. (eco friendly ganpati) वेगवेगळे देखावेदेखील यानिमित्तानं पाहायला मिळत आहेत.