Ganesh Festival 2023: पुण्यातील मानाच्या गणपतींचे वेगवेगळे रूप ठरणार भाविकांचे आकर्षणाचे केंद्र
Published : Sep 19, 2023, 11:08 PM IST
पुणेGanesh Festival 2023: गणेश उत्सवाच्या आगमनाचे स्वागत राज्यभर उत्साहात सुरू असून पुण्यातील मानाचे दुसरा तांबे जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला आज सकाळी सुरुवात झाली. पारंपरिक शंखनाद करून गणेशाच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. (Lord Ganesha in Pune) मंडळामध्ये शिवमुद्रा ढोल ताशा पथक वादन करत असून मोठा दिवस आणि उत्साह पुण्यातल्या सगळ्या रस्त्यावर आज दिसत आहे. मानाच्या पाच गणपती पैकी मानाचा दुसरा गणपती पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. अकरा वाजता तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळामध्ये संत रामदास यांच्या अकराव्या वंशजांच्या हस्ते या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दिवसभर पारंपरिक उत्सव सुरू होते. त्याचबरोबर यावर्षी गणेशाचे वेगवेगळे रूप सुद्धा तांबडी जोगेश्वरी मंडळाकडून दाखवण्यात आले. पुणेकरांकडून नेहमीच मानाच्या गणपतींचे आकर्षक रूप सादर करण्याचा प्रयत्न केला जातो.
मानाचा पहिला गणपतीग्रामदैवत श्री कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11:37 करण्यात आली आहे. डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11 : 50 ला झाली आहे. श्री समर्थ घराण्याचे अकरावे वंशज आणि सज्जनगड येथील भूषण महारुद्रा स्वामी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी झाली आहे. तत्पूर्वी सकाळी साडेनऊ वाजता मिरवणूक उत्सव मंडपातून मिरवणूक सुरू झाली. सुभाष आणि स्वप्नील सरपाले यांनी साकारलेल्या फुलांच्या आकर्षक रथामध्ये मूषकावर स्वार गणरायाची मूर्ती विराजमान होती..
मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबागेचा गणपती तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना दि पूना मर्चंट्स चेंबर्सचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया आणि जयराज अँन्ड कंपनीचे राजेश शहा यांच्या हस्ते सकाळी 11:30 मिनीटांनी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
गुरुजी तालीम मंडळाकडून यावर्षी उभ्यासी तिरुपती प्रतिकृती साकारण्यात आली असून दररोज गणेश मंडळात येणाऱ्या भक्तांना बालाजीचा प्रसाद सुद्धा दिला जाणार आहे. त्याप्रमाणे तिरुपती बालाजीला प्रसाद दिला जातो त्याच पद्धतीचा हा प्रसाद आहे
पुण्यातील बाजारामध्ये प्रसिद्ध असलेल्या गणपतीमध्ये तुळशीबाग गणपती. तुळशीबागची प्राण प्रतिष्ठान पूजा अर्चना करून आज साडेबाराच्या दरम्यान करण्यात आली. त्यापूर्वी भव्य मिरवणूक करण्यात आली होती. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गणपतीला चांदीच्या दागिन्याने सजवण्यात आले होते. चांदीचे दागिने गणपतीवर अर्पण करण्यात आले होते.
यावर्षी या गणपती मंडळाकडून महाकाल देखावा सादर करण्यात आला असून मध्य प्रदेशातली ही प्रतिकृती आता महाराष्ट्रामध्ये बघायला भेटणार असून त्याची माहिती सुद्धा इथे दाखवून देण्यात आलेले आहे. दरवर्षीप्रमाणे सगळ्या पूजा होऊन व्यापारी चेंबरच्या अध्यक्षांनी या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे.