Uttarakhand G20 Meeting : जी-२० देशांच्या पाहुण्यांमध्ये क्रिकेटची क्रेझ, मैत्रीपूर्ण सामन्यात केला उत्तराखंड पोलिसांचा पराभव! - परदेशी प्रतिनिधी क्रिकेट सामना
डेहराडून, उत्तराखंड - G20 च्या तीन दिवसीय इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांनी उत्तराखंडमध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. बुधवारी G20 चे प्रतिनिधी आणि उत्तराखंड पोलिसांचे जवान यांच्यात मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्तराखंड पोलिसांचा रॉयल 11 संघ आणि G20 प्रतिनिधींचा पँथर्स 11 संघ यांच्यात 8 - 8 षटकांचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना झाला. नरेंद्रनगर टिहरी गढवाल येथे हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पँथर्स 11 संघाने शानदार विजयाची नोंद केली. आज G20 बैठकीचा शेवटचा दिवस आहे. बैठकीनंतर सर्व पाहुणे ऋषिकेशमध्ये गंगा आरतीमध्ये सहभागी होतील. यानंतर, पाहुणे दुसर्या दिवशी पहाटे येथून प्रस्थान करतील. नरेंद्र नगरमध्ये झालेल्या इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपच्या बैठकीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीही सहभागी झाले होते.