Eknath Shinde Koyna Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कोयना जलाशयातून बोटीने प्रवास, पाहा व्हिडिओ - कोयना धरण
Published : Nov 6, 2023, 9:50 AM IST
सातारा Eknath Shinde Koyna Visit : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनस्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (5 नोव्हेंबर) कोयना जलाशयातून बोटीने प्रवास करत पाहणी केली. या पर्यटनस्थळामुळे जावली तालुक्यातील 105 गावांतील स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, हाऊस बोट, बोट क्लब यासह पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत. तसंच पर्यटकांसाठी निरीक्षण मनोरा, चेंजिंग रूम या सोयी देखील असणार आहेत. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून वासोटा किल्ला, नागेश्वर मंदिर, अहिरे पुल, बामणोली परिसराच देखील हवाई पाहणी केली. तसंच यावेळी स्थानिकांनी सुरू होत असलेल्या या पर्यटनस्थळाचा आर्थिक उन्नतीसाठी वापर करावा. तसंच हे पर्यटनस्थळ विकसित करताना स्थानिकांना त्यामध्ये सामावून घ्यावे, असंही शिंदे म्हणाले.