CM Eknath Shinde In Ayodhya : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शरयू नदीची महाआरती अन् पूजा; पाहा व्हिडिओ - एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा
अयोध्या (उत्तर प्रदेश) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येतील सरयू नदीच्या काठावर महाआरती केली. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही रामाचे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शरयू नदी पात्राची पुजा करत तेथे आरतीही केली. यावेळी साधू-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह इतर मंत्र्यांची मोठी रॅली काढत सकाळी जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्वच मंत्रिमंडळ राम मंदिरात दाखल झाले. तिथे महंतानी त्यांचे स्वागत केल्यानंतर श्री राम मंदिरात आरती झाली. हे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांसह शरयू नदी पात्राकडे दाखल झाले. त्यानंतर तीथे महापूजा आणि आरती करण्यात आली. यावेळीही मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते.