Diwali 2023 : साई मंदिरात 'दिवाळी'; शिर्डीत अकरा हजार दिवे प्रज्वलीत करत 'सबका मालिक' एकचा दिला संदेश - eleven thousand lamps in Shirdi
Published : Nov 12, 2023, 4:06 PM IST
शिर्डी :दिवाळी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. साईंच्या शिर्डीत ही तीन दिवस दीप उत्सव साजरा केला जातोय. दिवाळीच्या दिवशी साईंनी ज्या द्वाराकामाईत पाण्यानं दिवे प्रज्वलीत केले होते. त्याच द्वारकामाईच्या प्रांगणात शिर्डीच्या क्रांती युवक मंडळानं दिपोत्सव साजरा केलाय. साईमंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं दिपावली साजरी केली जाते. आकर्षक आकाश कंदील साईमंदिर परिसरात लावला गेला असून दिवाळीच्या या शुभ मुहर्तावर प्रत्येक जण मोठ्या उत्साहात दीप प्रज्वलीत करुन शिर्डीत बाबांच्या सानिध्यात दिवाळी साजरी करतात. भक्तांनी लावलेल्या हजारो दिव्यांनी साईमंदिर लखलखून जाते आणि त्याचं कारण म्हणजे साईबाबा प्रत्येकाच्या श्रद्धास्थानी आहेत. साईबाबांच्या मंदिराला दिवाळी निम्मीतानं आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून साई मंदिरात आज पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मी कुबेराचं पूजन केलं जाईल.