Diwali 2023 : दिवाळीनिमित्त शिर्डीतील साईबाबा मंदिरावर विद्युत रोषणाई - Diwali 2023
Published : Nov 10, 2023, 6:26 PM IST
शिर्डी Diwali 2023 :देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही परंपरेनुसार दिवाळी साजरी केली जातेय. या दिवाळीनिमित्त भुनेश्वर येथील भक्त दास गुप्ता यांच्या देणगीतून साईबाबांच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईमुळं साईबाबा मंदिरासह परिसर उजळून निघाला आहे. सबका मालिक एक हा महामंत्र देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीत अनेक चमत्कार केले, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. साईबाबांनी दिवाळीत द्वारकामाईमध्ये पाण्याने दिवे लावले होते, असं म्हणतात. त्यामुळं शिर्डीत दिवाळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिर्डीत साईबाबांचे अनेक भक्त दिवाळी साजरी करण्यासाठी येतात. त्यापैकी ओडिशा (भुवनेश्वर) राज्यातील साईबाबाचे भक्त दास गुप्ता यांनी साईबाबा समाधी, तसंच मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केलीय. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. साईबाबांनी दिलेलं मला दिलेलं मी परत करत असल्याचं दास गुप्ता यांनी म्हटलंय.