महाराष्ट्र

maharashtra

देवाला 1200 पदार्थांचे अन्नकूट अर्पण

ETV Bharat / videos

Annakut Celebration Bhavnagar: स्वामी नारायण मंदिरात श्रीकृष्णाला 1200 पदार्थांचे अन्नकूट अर्पण, पाहा व्हिडिओ - Annakut Celebration Bhavnagar

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 7:45 AM IST

भावनगर ( गुजरात )  Annakut Celebration Bhavnagar :भावनगर शहरात  नववर्षानिमित्त देवाला अन्नकूट अर्पण केलं जातंं. भावनगरमध्ये परमेश्वराला 1200 पदार्थांचं अन्नकूट अर्पण करण्यात आलं आहे. सरबत ते ताक आणि पराठ्यापासून पिझ्झापर्यंतच्या पदार्थांचा समावेश आहे. पहा भावनगरमध्ये अप्रतिम अन्नकुट प्रसादाचे आयोजन कुठे करण्यात आले होते. नववर्षात हिंदू धर्माप्रमाणे लोक भक्तिभावाने देवाला प्रसाद अर्पण करतात, तर भावनगर शहरातील अक्षरवाडी स्वामीनारायण मंदिरात मोठ्या संख्येने लोकांनी थाळीच्या रूपात विविध प्रकारचे पदार्थ देवाच्या चरणी अर्पण केले. सर्व भाविक भक्तांनी परमेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर अन्नकूट पूजन केले.  नवीन वर्षात सर्वात मोठा अन्नकूट अक्षरवाडीत होतो. अक्षरवाडी येथील भावनगर स्वामीनारायण संप्रदायाचे त्यागराजस्वामी म्हणाले की, भगवंताला प्रसन्न करण्यासाठी देवाचे भक्त ताट धरतात. त्यानिमित्तानं यंदाही भावनगर येथील अक्षरवाडी येथे भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अन्नकूटचे आयोजन करण्यात आले आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details