Discharge water from Gangapur dam: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Increase in water storage of Gangapur dam
नाशिक: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्ह्यातील सर्व धरणाची पाणी पातळी वाढली आहे.अशातच नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्याने आता गंगापूर धरणातून मोठया प्रमाणत विसर्ग करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे,यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. तर चवटी येथील भागातील मंदिर या पुरामुळे पाण्याखाली गेली आहेत,तसेच दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी अल्यामुळे प्रशासनाने गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.तसेच जिल्हा अपत्कालीन विभाग सतर्क झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST