Video : आई जीवदानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी - New Year 2023
नूतन वर्षाची सुरुवात विरारची ग्रामदेवता आई जीवदानी माता देवीच्या Jivdani Devi in Virar दर्शनाने व्हावी, अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते. त्यामुळे विरारमधील आई जीवदानी मातेच्या मंदिरात भाविक रांग लावून दर्शन darshan of Jivdani Devi in Virar घेतले. आज पहाटे ४ वाजता मंदिर उघडण्यात येवून जीवदानी मातेला अभिषेक करण्यात आला पावणे पाच वाजता देवीला शृंगार करून ५.३० ला आरती करण्यात आली. नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळत असते. यंदाही पहाटे पासून भाविकांनी गर्दी केली आहे. नववर्षाारंभ आणि सुट्टी यामुळे जास्त गर्दी होत आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांनी पायी चालत जाणे पसंत केले आहे. गर्दीमुळे देवस्थानकडून गर्दीचे नीट नियोजन करण्यात येत आहे. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाल्याने दुचाकी पार्किंग साठी सुद्धा जागा शिल्लक राहीली नाही. New Year 2023
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST