महाराष्ट्र

maharashtra

गजानन महाराजांचे दर्शन

ETV Bharat / videos

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं गजानन महाराजांचं दर्शन; राजकीय प्रश्नांवर बोलणं टाळलं - राजकीय प्रश्नांवर बोलणं टाळलं

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 11:04 PM IST

Updated : Dec 10, 2023, 3:40 PM IST

बुलडाणा Shri Gajanan Maharaj Sansthan : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. बुलडाणा जिल्ह्यामध्ये आयोजित शेगाव येथील कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी म्हणून ओळख असलेल्या संत गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. महाराष्ट्रमध्ये सर्वसामान्य भाविकांचे शिर्डीचे साईबाबा (Shirdi Sai Baba) आणि शेगावचे गजानन महाराज (Gajanan Maharaj) प्रमुख श्रद्धास्थान आहे. त्यामुळं मी आज गजानन महाराजांचं दर्शन घेतलं असल्याचं फडणवीस म्हणाले. मात्र यावेळी नवाब मालिकांवर अजित पवारांनी चुप्पी सोडली नसल्याचा प्रश्न विचारला असता, फडणवीस यांनी बोलणं टाळलं. मंदिरात कुठल्याही राजकीय प्रश्नांना उत्तर देणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी यावेळी घेतल्याचं पाहायला मिळालंय.

Last Updated : Dec 10, 2023, 3:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details