धारावीतील लोकांना मत देणारी मशीन म्हणून पाहू नका, दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरेंना टोला - मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण
Published : Dec 6, 2023, 1:47 PM IST
|Updated : Dec 6, 2023, 1:52 PM IST
शिर्डी Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मात्र तरीही आंदोलनं का केली जातात, दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलने केली जात आहेत का ? असा सवाल मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. यावेळी दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली होती. त्यावर मंत्री दीपक केसरकर म्हणाले, कर्नाटक, तेलंगाणामध्ये ईव्हीएम मशीन नव्हते का? असा सवाल उपस्थित करत 'नाचता येईना अंगण वाकडं' आहे. तेलंगणातील विजय तुम्हाला चालतो, मग भाजपा जिकंलं की तिथं ईव्हीएम मशीन दिसतं. हे भित्यापोटी ब्रम्हराक्षस असं झालं आहे. अदानी तुमच्याकडं आले की चालतात. दुसरीकडं गेले की चालत नाहीत. धारावीमधील लोकांकडं आस्थेनं बघा. त्यांना जो कुणी घर देईल ते पुण्याचं काम असेल. धारावीतील लोकांना मत देणारी मशीन म्हणून पाहू नका, असा टोला मंत्री केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.