परळच्या 110 वर्ष पुरातन मंदिरात दत्त जयंती साजरी; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी - परळच्या 110 वर्ष पुरातन मंदिरात दत्त जयंती साजरी
Published : Dec 26, 2023, 8:28 PM IST
मुंबईDatta Jayanti 2023 : मंगळवारी दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परळच्या दत्त मंदिरामध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम, भजन, पालखी सोहळा आयोजित केला होता. दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 110 वर्ष पुरातन असलेल्या या दत्त मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. परळमधील प्रसिद्ध अशा कीर्ती महल हॉटेलच्या ठिकाणी हे दत्त मंदिर आहे. या ठिकाणी एक विहिर देखील होती. मात्र, काही कारणास्तव हे मंदिर कीर्ती महालच्या समोरच असलेल्या कोठारे यांच्या जागी स्थलांतरित करण्यात आलं. 110 वर्षांपूर्वी हे मंदिर कोठारे यांच्या जागी हलवण्यात आल्याची माहिती, मंदिराचे स्वयंसेवक सुनील मंत्री यांनी दिलीय.
विठ्ठल मंदिरापर्यंत पालखी निघते : दत्तगुरूंचा जन्मोत्सव सहा वाजून दहा मिनिटांनी साजरा केल्यानंतर ही पालखी निघते. ही पालखी भोईवाडातील विठ्ठल मंदिरापर्यंत जाते. विठ्ठल मंदिरात ही पालखी पोहोचल्यानंतर विठ्ठलाला निरोप स्वरूप एक पणती या पालखीतून मंदिरात दिली जाते. त्यानंतर पुन्हा पालखी परत दत्त मंदिराकडे येते.