Dagdusheth Ganpati Procession: 'दगडूशेठ' गणपतीची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना, पाहा व्हिडिओ - अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृती
Published : Sep 19, 2023, 3:17 PM IST
पुणे Dagdusheth Ganpati Procession : 'जय गणेश... गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...'च्या जयघोषात दगडूशेठ गणपतीची श्री हनुमान रथातून थाटात मिरवणूक निघाली. श्री हनुमान रथातून निघालेल्या मिरवणुकीनंतर वाजत गाजत अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृतीत दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीनं हा उत्सव आयोजित करण्यात आला. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृतीमध्ये आज सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठापना झाली. 'श्रीं'ची विलोभनीय मूर्ती डोळ्यात साठविण्यासोबतच दर्शनासाठी भक्तांनी चौका-चौकात गर्दी केलीय. मुख्य पूजा मिलींद राहुरकर यांच्या पौरोहित्याखाली झाली. यावेळी बोलतताना डॉ. मोहन भागवत म्हणाले की, जगामध्ये शांती, सुबत्ता, परस्पर सौमनस्य नांदो हीच 'श्रीं'चरणी प्रार्थना आहे. ganeshotsav 2023