महाराष्ट्र

maharashtra

तरुणाला बेल्टने मारहाण

ETV Bharat / videos

Watch Video : मुस्लिम विद्यापीठात तरुणाला बेल्टने बेदम मारहाण; पायावर नाक घासायला लावले - तरुणाला बेल्टने मारहाण

By

Published : Jul 27, 2023, 5:39 PM IST

अलिगढ(उत्तर प्रदेश) - अलिगढ मुस्लिम विद्यापीठात एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. काही तरुण हे एकत्र येत एका तरुणाला बेल्टने मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. तरुणाला पाया पडायला लावत पायावर नाकही घासायला लावले असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रकरण सुलेमान वसतिगृहातील असल्याची माहिती मिळत आहे. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच व्हायरल झालेला व्हिडिओ एक महिना जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल असून, याची पृष्टी 'ईटीव्ही भारत' करत नाही.

पीडित तरुणाचा गंभीर आरोप - पीडित तरुणाने सांगितले की, माझे नाव आकाश आहे. मी महेशपूर गावचा रहिवासी आहे. एएमयूचा विद्यार्थी नेता फरमान हा मला दारू प्यायला सांगत होता, मी नकार दिल्यावर तो संतापला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आला आणि म्हणाला आकाश तुझ्याशी बोलायचं आहे. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या कारमध्ये बसवले आणि एएमयूच्या सुलेमान हॉस्टेलमध्ये नेले. तिथे मला एका खोलीत बसवले. त्यावेळी इतर 10 ते 12 तरुणही तिथे उपस्थित होते. त्या लोकांनी मला बेदम मारहाण केली. शिवीगाळ केली, तसेच मोबाईल हिसकावून घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details