महाराष्ट्र

maharashtra

बचाव करताना जवान

ETV Bharat / videos

Odisha Train Accident : ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात, 238 नागरिकांचा मृत्यू, पहा घटनास्थळाचे ड्रोन शॉट्स - रेल्वे अपघातात 278 नागरिकांचा मृत्यू

By

Published : Jun 3, 2023, 10:55 AM IST

भुवनेश्वर :ओडिशामधील बालासोरजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातात तब्बल 238 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नईवरुन हावडाकडे जात असताना हा भीषण अपघात घडला आहे. बालासोर जिल्ह्यातील बहनगा येथे कोरोमंडल एक्सप्रेस ही सुपरफास्ट रेल्वेगाडी समोरुन येणाऱ्या मालगाडीला धडकल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 278 नागरिकांचा बळी गेला आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता निर्णाण झाली आहे. या अपघातात तब्बल 800 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. दोन्ही रेल्वेगाड्यांची झालेली टक्कर इतकी भीषण होती, की अनेक बोगी चक्काचूर झाल्या आहेत. घटनास्थळावरचे दृष्य अतिशय भीषण आहे. अपघातातील जखमींचे बचावकार्य अद्यापही सुरूच आहे. एनडीआरएफ आणि बचाव पथकाचे जवान घटनास्थळावरुन नागरिकांचा अद्यापही शोध घेत आहेत.    

ABOUT THE AUTHOR

...view details