काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा 'मराठी बाणा'; सत्ताधाऱ्यांना मराठीतून घेतलं फौलावर - Mallikarjun Kharge Speech
Published : Dec 28, 2023, 10:21 PM IST
नागपूर Mallikarjun Kharge Speech Nagpur : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी नागपूर येथील महासभेत बोलताना मराठी भाषेतूनच सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल केलाय. अस्सल मराठी भाषेत बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धारेवर धरलं होतं. जर संघ आणि भाजपाला आताच आपण रोखलं नाही तर हा देश बरबादीच्या मार्गावर जाईल, असं देखील खरगे म्हणाले. केंद्र सरकारकडून प्रत्येक गोष्टीचा जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आपल्याला जणू स्वातंत्र्य हे २०१४ सालीच मिळालं असं भासवलं जात आहे. देशातील सर्व प्रश्न बाजूला सारून आता मोदी हे देवाच्या नावानं प्रचार सुरू करत आहेत. अतिशय चतुर पद्धतीनं मोदी रामाचा वापर करत असल्याचा आरोपही खरगे यांनी केलाय. देशात एकूण ३० लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत. पण त्या नोकऱ्या दलित, मागासवर्गीय लोकांना मिळतील म्हणून त्या भरल्या जात नसल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केलाय.