महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Maharashtra Political Crisis : काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही - कमलनाथ - Maharashtra Political Crisis

By

Published : Jun 22, 2022, 12:06 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात आणि सुरतमध्ये राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र गटासाठी 37 संख्या हवी आहे. परंतु, 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदे ( 40 MLAs support Eknath Shinde ) यांनी केला आहे. नुकताच शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे. व्हिडिओत आमदार निवेदनावर स्वाक्षरी करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 22 जून) शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी एक तातडीची बैठक बोलावली ( Mahavikas Aghadi Call Emergency Meeting ) आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे हजर राहणार असून ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, सेना आमदारांबाबतचा निर्णय शिवसेनेचे नेते घेतील. पण, काँग्रेसच्या आमदारांमध्ये एकी असून एकही आमदार फुटणार नाही, असेही कमलनाथ म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details