PM Modi Dehu Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याच्या पार्श्वभूमीवर आ. चंद्रकांत पाटील यांनी घेतला देहूतील कामाचा आढावा
पुणे : देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी १४ जून रोजी श्री क्षेत्र देहू येथे येणार असून, त्यांच्या हस्ते जगद्गुरू तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या देहू नगरीत सुरू आहे. या कामाचा आढावा आज भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला. तसेच, श्री पाटील यांनी यावेळी जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिरात जाऊन, तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी आ. पाटील यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST