महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Eknath Shinde Speech : लक्झमबर्गचे पंतप्रधान मला म्हणाले मी मोदींचा भक्त-एकनाथ शिंदे - Eknath Shinde Praised Pm Narendra Mod

By

Published : Jan 20, 2023, 10:48 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:39 PM IST

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरूवारी मुंबईत विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले होते. लोकर्पणाच्या कार्यक्रमात मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत असताना महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली. 

दावोसच्या परिषदेतील एक प्रसंग : शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजविले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावरील सभेत बोलताना लक्झमबर्गच्या पंतप्रधानांचा दाखला दिला. एकनाथ शिंदे हे दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला गेलेले असताना लक्झमबर्गचे पंतप्रधान त्यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी दावोसच्या परिषदेतील एक प्रसंग सभेत सांगितला. लक्झमबर्गचे पंतप्रधान मला दावोसमध्ये भेटले. ते म्हणाले मी मोदींचा भक्त आहे. माझ्यासोबत फोटो काढला आणि म्हणाले मोदीजींना हा फोटो दाखवा, असे शिंदे यांनी सांगितले. यापुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी जर्मनी आणि सौदी अरेबियाचे प्रमुख लोकसुद्धा मोदींबद्दल विचारत होते, असेही सांगितले. पण एकनाथ शिंदे यांनी लक्झमबर्गच्या पंतप्रधानांचा किस्सा सांगतल्यानंतर तो चर्चेचा विषय ठरला आहे. लक्झमबर्ग हा देश नेमका कुठे आहे, असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

मुंबईचा संपूर्ण कायापालट करणार:मुंबईचा विकास करायचा आहे तसेच पुनर्विकासाचे प्रकल्पही पुढे नेत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बीकेसीमधील सभेत बोलत होते. कुणी कितीही टीका केली तरी आपण काम करत आहोत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. पुढील तीन वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापालट करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली भाषणात दिली. 

महाविकास आघाडी सरकारवर टीका :  येणाऱ्या काही दिवसात महापालिकेच्या निवडणुका होतील. विकासाचे डबल इंजिन ट्रिपल इंजिनमध्ये परिवर्तित होईल असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. ठाकरे सरकारने अनेक प्रकल्प रखडवले असे शिंदे म्हणाले. मात्र यापुढे तसे होणार नाही. मुंबईला ट्रिपल इंजिनची शक्ती मिळेल आणि मुंबईचा संपूर्ण कायापालट होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Feb 3, 2023, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details