Eknath Shinde On Ashadhi Ekadashi : आषाढीच्या महापूजेचा मान मिळाला हे माझे भाग्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा २९ जुलै रोजी
सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात आले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय होणार आहे. या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी दहा ते बारा लाख भाविक पंढरपुरात दाखल झाल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे. शिंदे यांचे दुपारी चारच्या सुमारास सोलापूर शहरात आगमन झाले. शहरातील बालाजी हॉटेलमध्ये तीन तास थांबल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. सायंकाळी सातच्या सुमारास जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी सदिच्छा भेट दिली. बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिंदेंचा ताफा पंढरपूरकडे रवाना झाला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आषाढी वारीला येणाचा माला मान मिळाला हे माझे भाग्य समजतो, तसेच शेतकऱ्यांसाठी समृद्धी, पाऊस, निसर्गाची साथ लाभू देण्याचे साकडे विठुरायांकडे घालणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा २९ जुलै रोजी होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. मॅट, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे आदी सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगा, महिला भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.