Chandrayaan 3 : सोन्यापासून बनवलं 'चांद्रयान-3' चे मॉडेल; पाहा व्हिडिओ
Published : Aug 22, 2023, 4:46 PM IST
|Updated : Aug 22, 2023, 4:56 PM IST
तामिळनाडू - तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील एका कलाकाराने 4 ग्रॅम सोन्याचा वापर करून 'चांद्रयान-3' चे मॉडेल तयार केलंय. हे मॉडेल 1.5 इंच इतकं उंच आहे. 'चांद्रयान-3' चा 'लँडर विक्रम' 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी सज्ज आहे. चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगकडे सर्व जगाचे लक्ष लागलंय. देशभरातील विविध मंदिरांमध्ये यानाच्या यशस्वी लँडिंगसाठी पूजा करण्यात येत आहे. (Gold Chandrayaan 3 Model)
सोन्यापासून बनवले चांद्रयानचे मॉडेल - तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील एका कलाकाराने 4 ग्रॅम सोन्याचा वापर करून चांद्रयान-3 चे मॉडेल तयार केले. मरियप्पन या कलाकाराने हे मॉडेल तयार केलंय. मरियप्पन सांगतात की, जेव्हा जेव्हा एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असतो तेव्हा मी सोन्याचा वापर करून त्याचे मॉडेल बनवतो. चांद्रयानाचे लँडिंग हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. 'चांद्रयान' प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्व शास्त्रज्ञांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी ४ ग्रॅम सोन्याचा वापर करून हे मॉडेल तयार केलंय. ते डिझाइन करण्यासाठी मला 48 तास लागले. सोन्यापासून बनवलेले हे छोटे 'चांद्रयान-3' मॉडेल अतिशय आकर्षक दिसते.