CCTV उदयनराजेंच्या समर्थकावर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद
सातारा उदयनराजे भोसले यांचे समर्थक दीपक उर्फ आप्पा मांढरे याच्यावर राजवाडा परिसरात झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या गुन्ह्यात १९ वर्षाच्या तरूणासह दोन अल्पवयीन मुलांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी (दि. ९) रात्री सव्वा अकराच्या सुमारास राजवाडा परिसरात उभा असताना मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी आप्पा मांढरेवर गोळ्या झाडल्या होत्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला ( Firing incident in CCTV footage ) होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST