Prithviraj Chavan : 'भाजप देशभर जातीय दंगली..', राज्यातील हिंसाचारावर पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे वक्तव्य - कोल्हापूर दंगल
सातारा - राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या जातीय हिंसाचारावर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात द्वेषाचे वातावरण तयार केल्याशिवाय भाजपला निवडणुकीत यश मिळत नाही. रामनवमीच्या काळातील दंगली ह्या पूर्वनियोजित होत्या. आता धार्मिक ध्रुवीकरणासाठी भाजपकडून भविष्यात देशभर दंगली घडवून आणल्या जातील, असे पृथ्वीराज चव्हाण प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. ते आज साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापुरातील दंगली संदर्भात पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशात अल्पसंख्याक समाजाला भयभीत केले जात आहे. कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात केंद्रीय गृहखाते पुर्णत: निष्प्रभ ठरले आहे. राज्यात कोल्हापूरमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यावर नियंत्रण आणण्यात यश मिळाले आहे.