महाराष्ट्र

maharashtra

Chandrasekhar Bawankule

ETV Bharat / videos

Chandrashekhar Bawankule : मराठा आरक्षण; चंद्रशेखर बावनकुळेंकडून छगन भुजबळांची पाठराखण - BJP state president Chandrasekhar Bawankule

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 9:03 PM IST

पुणे Chandrashekhar Bawankule : मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. काहींनी भुजबळांच्या वक्तव्याचा विपर्यास केलाय. छगन भुजबळ यांनी घेतलेली भूमिका सर्वपक्षीय बैठकीत ठरलेल्या भूमिकेसारखीच आहे. त्या बैठकीत आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काम करावं, असं ठरलं होतं. सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणं सरकारनं काम करावं, असं भुजबळ सांगत असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचं सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं होतं, तसंच आरक्षण देण्याची छगन भुजबळांची मागणी आहे. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, असं मत छगन भुजबळांचं असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. एकीकडं मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून, सरकारला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.  

ABOUT THE AUTHOR

...view details