Fire In J P Nadda Program: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आरती करत कळसाला लागली आग; पाहा व्हिडिओ - Pune fire
Published : Sep 26, 2023, 9:42 PM IST
|Updated : Sep 26, 2023, 10:09 PM IST
पुणेFire In J P Nadda Program : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्यातर्फे विविध गणेश मंडळांना भेटी देण्यात येत आहे. अश्यातच जे. पी. नड्डा यांनी भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या साने गुरुजी मंडळाला भेट दिली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आरतीसाठी आतमध्ये आले. तेव्हा आरती सुरू असतानाच अचानक मंडळाच्या वतीनं साकारण्यात आलेल्या देखाव्याच्या कळसाला आग लागली. तेव्हा जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळं आग काही मिनिटांत विझली. यामुळं मोठी दुर्घटना टळली. (Pune fire) त्यामुळे नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावं लागलं. साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीनं महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलीय. (J P Nadda in Pune)