महाराष्ट्र

maharashtra

थरार सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat / videos

पुण्यात दुचाकीस्वाराची गाडीला जोरदार धडक, जागीत मृत्यू, थरार सीसीटीव्हीत कैद - चालकाचा मृत्यू

By

Published : Jun 19, 2023, 8:11 PM IST

पुणे : रस्त्यावर वाहन चालवत असताना अनेक सूचना आणि फलक लावलेले आपण पहातच असतो. रस्ता सुरक्षा तसेच वाहन चालवताना काय-काय काळजी घ्यावी याबाबत सूचना असताना काही तरुणांकडून भरधाव वेगाने वाहने चालवली जातात आणि अपघात घडत असतात. पुण्यातील सहकार नगर परिसरामध्ये अशीच एक अपघाताची घटना घडली आहे. रात्रीच्या वेळेस वेगाने टू व्हीलर चालवणाऱ्याचा अपघात झाला. यात चालकाचा मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली. पुणे शहरात नशेत गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सहकार नगर परिसरात रात्रीच्यावेळी रस्त्याने जाणाऱ्यांना अडवले जाते. कोयत्याचा धाक दाखवून त्यांना लुटलेही जाते. रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगार रात्रीच्या वेळेस शहरात येतात व रस्त्याने एकट्या जाणाऱ्याला लुटतात. या अपघाताची भीषणता बघता दोन चाकी चालकाचा जागेवर मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details