Video ठोंबरे कुटुंबाने मौन सोडले आणि म्हणाले आम्हाला विकास करायचा, एकमेकांवर टीका नाही करायची - Bhausaheb Thombre
औरंगाबाद : कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे ( Bhausaheb Thombre ) व कॉंग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष पंकज ठोंबरे ( Pankaj Thombre ) यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र औरंगाबाद च्या वैजापूर तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब चिगटगावकर ( Bhausaheb Chigatgaonkar ) यांचा या पक्ष प्रवेशाला विरोध कायम असून त्यांनी ठोंबरे कुटुंबावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देण्यासाठी ठोंबरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी बोलतांना भाऊसाहेब ठोंबरे यांनी असे म्हटले की, माझ्या पुतण्याला राष्ट्रवादी मध्ये आण्यासाठी येथील स्थानिक कार्यकर्ते यांनी खास भूमिका बजावली आहे. आमदार सतीश चव्हाण यांची यात काहीही भूमिका नाही व चिगटगावकर यांनी केलेले आरोप किती खरे किती खोटे आहे हे तुम्हला माहीतच आहे. त्यावर मी जास्त बोलणार नाही. व आम्हला सर्वांना सोबत राहून विकासावर काम करायचे आहे. तर कॉग्रेस युवकचे प्रदेश अध्यक्ष पंकज ठोंबरे यांनी आमदार चिगटगांवकर यांनी केलेल्या आरोपावर बोलतांना म्हणाले की, मी त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या सहकार्यमार्फत भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी माझ्याशी बोलण टाळले हेही मी पक्षाला सांगितले आणि अखेर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला अखेर पक्ष प्रवेश दिला, असे पंकज ठोंबरे म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST