Aurangabad Crime हॉटेल मालकाची दुचाकी पेटवत व्हिडिओ ठेवला स्टेटसला, दहशत माजवण्यासाठी केले कृत्य - हॉटेलची तोडफोड
औरंगाबाद स्वत:च्या नावाची दहशत माजवण्यासाठी एका आरोपीने रशिदपुरा येथे हॉटेलची तोडफोड Vandalism of hotel करत, हॉटेल मालकाच्या दुचाकीला आग fire to bike लावली. इतकेच नाही तर जळत असलेल्या दुचाकीचा व्हिडिओ स्टेटस Burning Bike Video On Status म्हणून ठेवला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दखल करत तपासाला सुरुवात केली आहे. शेख नासेर उर्फ इंता असे आरोपीचे नाव असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी संध्याकाळी आरोपी इंता हा हॉटेलवर आला व त्याने मोहम्मद यांना 'तु यहा पे धंदा कैसे करता' असे म्हणत हॉटेलची तोडफोड करीत मारहाण केली. या तोडफोडीत हॉटेलचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर आरोपी इंता एवढ्यावरच न थांबता त्याने मध्यरात्री मोहम्मद यांचे घर गाठत घरासमोर उभी केलेली दुचाकीची पेट्रोल नळी काढून ती पेटवली hotel owner bike set on fire. यानंतर मोहम्मद यांच्या घराच्या दरवाज्यालाही पेटवून देण्याचा प्रयत्न केला. आवाज झाल्याने मोहम्मद झोपेतून उठले त्यांनी इंताला जाब विचारला असता जीवे मारण्याची धमकी death threat to hotel owner देत पसार झाला. आपली दहशत बसावी म्हणून आरोपीने काही वेळाने मोहम्मद यांच्या जाळलेल्या दुचाकीच्या व्हिडिओवर जलवा है हमारा असे स्टेटस ठेवले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST