महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 24, 2022, 4:36 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ETV Bharat / videos

Athar Hussain : धनीपूरच्या प्रस्तावित मशिदीची राम मंदिराशी तुलना योग्य नाही - अतहर हुसैन

अयोध्या : न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिराच्या उभारणीचे (Ram Temple Construction) काम युद्धपातळीवर सुरू झाले असून; जवळपास निम्मे काम पूर्ण होणार आहे. ईटीव्ही इंडियाशी बोलतांना इंडो-इस्लामिक फाऊंडेशनच्या (Indo Islamic Foundation) सचिव अतहर हुसैन (Secretary Athar Hussain) यांनी सांगितले की, धनीपूर गावातील प्रस्तावित मशिदीची राम मंदिराशी तुलना करणे योग्य नाही. अयोध्या विकास प्राधिकरणाने (Ayodhya Development Authority) धनीपूर गावातील प्रस्तावित मशीद, रुग्णालय आणि ग्रंथालयाच्या योजनेला मंजुरी दिलेली नाही. प्रत्येक शहरात इमारत बांधण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते आणि काही कागदपत्रे यांचा पुर्तता केली जाते. त्यानंतर नकाशा मंजूर होतो. आम्ही देखील या सर्व गोष्टींची पुर्तता केलेली आहे, ते लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे. धनीपूर गावातील प्रस्तावित मशिदीची राम मंदिराशी तुलना करणे योग्य नाही. राम मंदिरासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात भक्त आहेत. ज्यासाठी संपूर्ण चळवळ झाली आहे आणि आता ते मोठ्या प्रमाणावर उभारले जात आहे. मशिदीबाबत प्रशासनाकडून काही अडथळे आहेत, ते लवकरच दूर करून नकाशा मंजूर झाल्यानंतर बांधकामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details