महाराष्ट्र

maharashtra

VIDEO अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत अनिल परब देतायत प्रत्येक बूथला भेट

By

Published : Nov 3, 2022, 2:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

मुंबई अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली Andheri East Assembly ByElection आहे. हे मतदान सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालणार आहे. एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडी तर्फे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके रिंगणात Uddhav Balasaheb Thackeray group Candidate Rituja Latke आहेत. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत या मतदान प्रक्रियेला लोकांचा अत्यंत अल्प प्रतिसाद दिसून येतोय. त्यामुळे आता शिवसेनेचे नेते इथल्या प्रत्येक बुथला भेटी देऊन मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येण्याच आवाहन करत आहेत. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी देखील आज इथल्या प्रत्येक बुथला भेटी Rituja Latke दिल्या. सर्वसाधारणपणे पोटनिवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ही कमीच असते. त्यातही समोर जेव्हा तुल्यबळ उमेदवार नसतो तेव्हा लोकांमध्ये फार उत्साहान नसतो. जेव्हा दोन्ही तुल्यबळ उमेदवार समोरासमोर असतात त्यावेळी दोनही पक्ष आपापले मतदार रस्त्यावर उतरवत असतात. निवडणुकीत शिवसेना आणि आमचे महाविकास आघाडीचे सहकारी पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रावर येऊन आपला हक्क बजावण्याचे आवाहन करत आहेत. माझ्याकडे आलेला साधारण 11 ते 12 वाजेपर्यंत 12 टक्के मतदान झालेलं आहे.अशी माहिती आमदार अनिल परब Anil Parab यांनी दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details