Ajit Pawar Performing Aarti : अजित पवारांचं पुण्यात शक्तीप्रदर्शन; 'बाप्पा'चं घेतलं दर्शन - Ajit Pawar Performing Aarti
Published : Sep 10, 2023, 11:25 AM IST
पुणे : Ajit Pawar Performing Aarti :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. पक्ष वाढीसाठी अजित पवार हे राज्यभर सभा तसेच विविध कार्यक्रम घेत आहेत. आज (रविवार) अजित पवार यांची कोल्हापूर येथे सभा आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीकडून पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं पुणे शहरातील विविध रस्त्यांवर जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी अजित पवार यांच्याकडून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) बाप्पाची आरती करत अभिषेक करण्यात (Ajit Pawar at Dagdusheth Ganpati Mandir) आला. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे, पुत्र पार्थ पवार, शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.