बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबड अन् शुद्ध आल्यावर वेगळीच बडबड; धनंजय मुंडेंची आव्हाडांवर टीका - धनंजय मुंडे
Published : Jan 7, 2024, 9:33 PM IST
बीड Dhananjay Munde : प्रभू राम यांच्याबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड कशा अवस्थेत होते ते पाहावं लागेल. शब्द माघारी घेतल्यानंतर ते कुठल्या अवस्थेत होते हे पाहिलं पाहिजे. ते शुद्धीवर होते का? (Jitendra Awhad) एखादा माणूस बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबड करतो आणि शुद्ध आल्यावर वेगळं बोलतो. ती अवस्था कोणती होती हे पाहावं लागेल. देव सर्वांचा आहे. धर्म वेगळा आहे. (Controversial Statements) प्रभू राम काय खात होते, आव्हाड साक्षीदार आहेत का? त्यांच्या आजोबांना तरी माहिती आहे का? असं भाष्य करताना आव्हाड यांची अवस्था तपासायला पाहिजे. त्यांच्या सहकाऱ्यांना विचारलं पाहिजे, असं राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. (God Ram)
'या' प्रोजेक्टचा शेतकऱ्यांना फायदाच : शेतकऱ्यांच्या संदर्भात 'फार्मर आयडी' हा केंद्र सरकारचा पायलट प्रोजेक्ट बीड जिल्ह्यात राबविला जात आहे. गोष्टीची ऑनलाईन प्रक्रिया झाल्यानं शेतकऱ्याला कोणत्याही बँकेच्या दारामध्ये कर्जासाठी जावे लागणार नाही, अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे. केंद्राच्या या महत्त्वकांशी प्रकल्पात बीड जिल्ह्याची निवड झाली आहे. आतापर्यंत 63% काम झालं. उर्वरित काम करून 100% शेतकऱ्यांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. माध्यमांनी देखील ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा, असं कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.