Aashadhi Wari 2023: 'ज्ञानोबा माऊली'च्या जयघोषात ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान, 'अशी' केली प्रशासनाने तयारी
पुणे : 'ज्ञानोबा माऊली'च्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान होत आहे. हे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. ज्ञानोबा माऊली'च्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान 'टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, या जयघोषात टाळ-मृदंगाच्या तालावर वारकरी भजनात दंग आहेत. भक्तिमय वातावरणात लाखो वारकरी हे वारीत सामील झाले आहेत. संत तुकाराम महाराज पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराज याची पालखी पुण्यात येणार आहे. पुणे शहरात शहराच्या मध्यवर्ती वस्तीत सकाळपासूनच वारकरी हे दाखल झाले आहेत. विविध मंडळे तसेच लोकांकडून वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुण्यातील नाना पेठ येथे असलेल्या विठ्ठल मंदिरात पालखी विसावा घेणार आहे. आषाढी वारीनिमित्त मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांना जेवण, मेडिकल, तसेच दर्शनासाठी विशेष अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरातील तयारीची ईटीव्ही भारत वतीने आढावा घेण्यात आला आहे.