मुनगंटीवारांच्या शिष्टमंडळाकडून राज ठाकरे यांना अनोखी भेट; बांबूच्या तिरंग्यांने केले स्वागत
चंद्रपूर - भाजप नेते सुधारी मुनगंटीवार यांनी पाठवलेल्या भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मंगळवार (दि. 20 सप्टेंबर)रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी त्यांना बांबू तयार झालेला तिरंगा आणि बांबूपासून तयार करण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो भेट देण्यात आला. विशेष म्हणजे त्यातून मोदी यांचा रेकॉर्ड झालेला आवाज ऐकू येतो. शिष्टमंडळात माजी महापौर राखी कंचर्लावार, भाजप शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, बिरजू पाझारे यांची उपस्थिती होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST