महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

CCTV : सुरक्षा रक्षकाने अडवल्याने तृतीयपंथीयांनी बदडले, गुन्हा दाखल

By

Published : May 23, 2022, 10:24 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

मेडचल (तेलंगणा) - जिल्ह्यात सुरक्षा रक्षकाने तृतीयपंथीयांना थांबवले असता त्यांनी सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मेडचल जिल्ह्यातील प्रगती नगर बच्चुपल्ली येथील सोसायटीच्या गेटवर एक सुरक्षा रक्षक कर्तव्यावर होता. दरम्यान रविवारी (दि. 22 मे) पहाटे चारच्या सुमारास तृतीपंथीयांचा एक गट ( TRANSGENDERS ) पोहोचला. त्यांना सुरक्षा रक्षक ईश्वर राव यांनी अडवले आणि त्यांना आत जाऊ दिले नाही. यामुळे संतापलेल्या तृतीयपंथीयांनी सुरक्षा रक्षकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान त्यांनी सुरक्षा रक्षकाला पाईप आणि खुर्च्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे सुरक्षारक्षक जखमी झाला. याप्रकरणी बचुपल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details