महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

350 varieties of mangoes : एकाच बांगेत ३५० आंब्याच्या जाती, देशी आंब्यांच्या १५५ जातींचे जतन - SC Shukla on Mango Garden

By

Published : Jun 9, 2022, 9:21 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी दशहरी आंब्यासाठीही ( Dussehri Mango ) ओळखली जाते. फळपट्टा परिसरात सध्या आंब्याचा बहार ( mango spring in the fruit belt area ) आहे. येथील एका शेतकऱ्याने अशी बाग तयार केली आहे, ज्याचा प्रत्येक 'आंबा' काहीतरी 'खास' ( mango of garden in UP ) आहे. या बागेतील प्रत्येक आंबा त्याच्या रंग, चव आणि सुगंधाने तुम्हाला मोहित करेल. हा आंबा दिसायला आणि खायला तर चांगलाच आहे, पण तो खूप टिकाऊही आहे. बागेची लागवड करणारे एस. सी. शुक्ला ( SC Shukla on Mango Garden ) सांगतात की, या बागेत एक फुटापासून ते पाच फुटापर्यंतची झाडेही चांगली फळे देत आहेत. यासोबतच या बागेत रसायनांचा वापर न करता नैसर्गिक शेती पद्धतीने आंबा पिकवला जात आहे. ही फळे आरोग्यासाठी खूप चांगली असतात. त्यांची चवही इतर फळांपेक्षा चांगली असते. बारमाही आंब्याची झाडेही या बागेत आहेत. या बागेत अमेरिका, आफ्रिका, इंडोनेशिया, मॉरिशस, बाली, श्रीलंका, थायलंड यांसह विविध देशांतील आंब्यांच्या प्रजातींची लागवड केली आहे. त्यांना आता फळे येत असल्याचे एस.सी. शुक्ला सांगतात. एवढेच नाही तर या बागेत नामशेष होत चाललेल्या देशी आंब्यांच्या 155 जातींचे जतनही करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details