महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

काश्मीरमध्ये दंगली झाल्या त्यावेळी राज्यपाल भाजपचे होते अन् तत्कालीन सरकारला भाजपा पाठिंबा होता - महेश तपासे - काश्मीरमध्ये दंगली

By

Published : Mar 17, 2022, 7:28 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ठाणे - कश्मीर फाईल चित्रपट ( Kashmir Files Movie ) नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटाच्या आडून काँग्रेसला बदनाम करण्याचे षड्यंत्र भाजपने रचल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे ( NCP Leader Mahesh Tapase ) यांनी केला आहे. प्रदेश प्रवक्ते महेश तपासे हे कल्याण-डोंबिवली महापालिकेत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर टीका केली आहे. कश्मीर फाईल हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भाजपने त्यावर राजकारणाची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत एक समुदायाला बदनाम करायचे, धर्मनिरपेक्ष पक्षाला बदनाम करायचे, जणूकाही काश्मीर खोऱ्यातील हिंसाचारासाठी कॉंग्रेस पक्ष जबाबदार असल्याचे भाजपकडून राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे. ज्या काळात काश्मीर खोऱ्यात दंगली झाल्या, हिंसाचार झाला, त्या काळात देशात काँग्रेस सरकार नव्हती. तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या तिसऱ्या आघाडीचे सरकार होते. त्यावेळी भाजपचाच त्या सरकारला पाठिंबा होता. विशेष म्हणजे त्यावेळी काश्मीरमध्ये राज्यपालही भाजपचे होते. मात्र, आज वेगवेगळ्या पद्धतीने इतिहास मांडून जातीय तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य भाजप नेते करत आहेत. जणू काही धर्मनिरपेक्ष पक्षच सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे, असेही चित्र रंगवायाचे प्रयत्न भाजप नेते करत असल्याचा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details